महाराष्ट्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा राष्ट्राभिमान सदैव प्रेरणादायी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस प्रखर राष्ट्रभक्त म्हणून देशाच्या सदैव स्मरणात राहतील. त्यांचा राष्ट्राभिमान, त्याग प्रेरणादायी राहील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त यापुढे त्यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ओतप्रोत राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा नेताजींवर मोठा प्रभाव होता.सशस्र क्रांतीशिवाय दमनकारी ब्रिटिश राजवटीला हटविता येणार नाही, या उर्मीतून त्यांनी आझाद हिंद सेना उभी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्फूर्तीस्थानी मानणाऱ्या नेताजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या कुंडात आयुष्य झोकून दिले. युवा पिढीसमोर त्यांनी मातृभूमीचे रक्षण आणि प्रखर राष्ट्रभक्तीचा उत्तुंग आदर्श ठेवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले, तसेच देशवासियांना 'पराक्रम दिना'च्या शुभेच्छा दिल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधींजींचे नेतृत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने तर, नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने देशाचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी केला. महात्मा गांधीजींनी 'देशभक्तांचे देशभक्त' असा नेताजींचा गौरव केला होता, नेताजींनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' संबोधून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या, अशा शब्दांत अजित पवार यांनी नेताजींचा गौरव केला.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण