महाराष्ट्र

मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार; १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत करणार चर्चा

Published by : Lokshahi News

राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsingh Koshyari यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होणार आहेत.राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर चर्चा करतील. ८ महिने होऊनही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून केली जाणार आहे.विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा याचबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार आहे. त्यामुळे, या भेटीतून तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण