मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवारी ३० जुलै रोजी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून तिथून त्यांच्या दौरा सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून साडेअकरा वाजता शिरोळ-नृसिंहवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहमी करतील. त्यानंतर पुढे शाहूपूर, गंगावेश, शिवाजी पूल रस्ता आणि आसपासच्या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री पाहणीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.