मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची भेट घेतली आहे. वांद्रे स्थित गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले.
रविवारी, 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. लमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली होती.
मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमागे कोण आहे, त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जे या कटात सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले.