शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. तर या गटाकडे आमदारांचा ओढा कायम आहे. अनेक अपक्षांचाही शिंदेंना पाठिंबा आहे. या सगळ्यांसह आता शिंदे राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. याचदरम्यान जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऑनलाईन संवाद साधला असता, यावेळी ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
"मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही म्हणून वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय. स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. कोरोनामुळे डोळ्यात पाणी ते अश्रू नव्हते. मी बरा होऊ ने म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय... पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती अशी माहिती उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधताना दिली आहे.
माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा. माझं मुख्यमंत्रीपद मान्य न करणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केले, त्यांना मी नगरविकास खाते दिले. ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा असे आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना केले आहे.