आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात पोहोचले आहेत. पहाटे २.२० वाजता विठ्ठलाच्या महापुजेला सुरुवात होणार आहे.
दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात यात्रा भरते. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे मोजक्या लोकांसोबत शासकीय महापूजा करण्यात येते. यंदाही पालखी चालत न जाता शासकीय बसने पालखी नेण्यात आली. पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे.