विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 12 आमदारांच्या नियुक्तयांबाबत आठवण करून दिल्याची माहिती दिली.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.
"मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांना भेटलं जातं. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं जी काही स्थिती झालीय, धरणाची स्थिती याबाबत चर्चा केली. बारा आमदारांच्या नियुक्तीचा ठराव घेतला होता. त्याची विनंती आज पुन्हा राज्यपालांना करण्यात आली. त्याचा तातडीनं निर्णय घ्यावा अशी विनंती केली", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.