मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडत आहे. या सभेतून ते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत असतात.
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांची मुलाखत झाली.
या कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या हाताखाली एखादा मराठा काम करतो. तो जातीने माझ्यापेक्षा मोठा आहे. एखादा दलित आहे. तो कलेक्टर होतो आणि त्याच्या हाताखाली एखादा मराठा असेल बरोबर आहे त्यांनी काम करताच नये. कारण त्याची लायकी नाही. कारण तो दलिस समाजाचा आहे. आदिवासी समाजाचा आहे. तो माळी आहे. कारण त्यांच्या हाताखाली काम करणं हा मराठ्यासाठी गुन्हा आहे. मराठ्यांनी त्यांचे ऐकायचे, त्यांच्या हाताखाली काम करायचे. बरोबर नाही. मराठे हे एक नंबर. त्यांच्या हाताखाली आपण काम करायला पाहिजे. आमची लायकी नाही आम्ही मान्य करतो. जरांगे साहेबांचे विधान योग्य आहे. माझी लायकी नाही. असे छगन भुजबळ म्हणाले.