अनिल ठाकरे |चंद्रपूर : रेतीला सोन्याचे भाव आलेत.हे सोनं गोळा करण्यासाठी नियमांना पायदाळी तुळविल्या जात आहे. गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यातील परवानाधारक रेती ठेकेदारांनी तर कहरच केला. जिवनदायी असलेल्या वैनगंगा नदीचा पात्राची दिशाच बदलविली. रात्रबेरात्र बेसूमार सूरू असलेल्या रेतीचा उपश्याने काही गावांना पुराचा फटका बसण्याचा धोका वाढला आहे.विशेष म्हणजे गावकरी अन पर्यावरणवाद्यांची ओरड होत असतांना महसूल विभागाने डोळे बंद केले आहेत.
गोंडपिपरी तालुक्याला तीन नद्यांचे वरादान लाभले आहे. वैनगंगा, वर्धा, अंधारी या नद्यांनी शेतीला नवसंजिवनी बहाल केली. या नद्यातील पाण्याने येथिल शेती हीरवीगार झाली.मात्र येथिल शेतीला धोकाही तितकाच. नदीला मोठा पुर आला कि शेती पुराखाली जाते.परिणामी बळीराजाचे लाखोचे नुकसान होत असते. आता रेतीचा बेसूमार उपसामुळं गोंडपिपरी,पोंभुर्णा तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा, तारडा घाट आणि पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्हारपूर घाटातून नियमबाहृय होणारा रेतीचा उपसा शेतीसाठी मारक ठरणारा आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांचा आत्महत्या ...!
- पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान ,नापिकी यामुळं डोक्यावर वाढलेलं कर्जाचं ओझं यातून दरवर्षी गोंडपिपरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या होत असतात.शेतकरी आत्महत्यांना अद्यापही जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेतलेलं नाही.ही शोकांतिकाच..!