महाराष्ट्र

पुणेकरांनो लक्ष द्या! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त 'या' वाहतूक मार्गात बदल

पंतप्रधान मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हे कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात आल आहेत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हे कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात आल आहेत. या संबंधीची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. मोदी यांचा हा एकदिवसीय दौरा असणार असून विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्नीकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉफ्टरने शिवाजीनगर (सिंचननगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पोहचतील. पुढे ते वाहनाने रस्तेमार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले...

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड