महाराष्ट्र

वाशिमच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे बिनविरोध

Published by : Lokshahi News

गोपाल व्यास, वाशिम | वाशिमच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे निवडून येतील हे भाकीत अनेक राजकीय जाणकारांनी केले होते, अखेर ते भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज रोजी चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्यविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडूण आले. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्व पक्षीय घडी बसविण्यात चंद्रकांत ठाकरे यशस्वी ठरले.

जिल्ह्याच्या राजकारणातील दादा म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. याचे भाकीत अनेक राजकीय जाणकारानी केले होते. ते भाकीत तंतोतंत खरे ठरले.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...