भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे, जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता स्पष्ट दिसायला लागेल. छोटा नंबर आहे. दूरचं आधीही चांगलं दिसत होतं, आताही चांगलं दिसतं असं म्हणत ताईला चष्मा लागला असं गाणं म्हटले.
त्यांच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पंकजा मुंडेंचे दुर्दैव आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते.पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.