भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवास्थानी ही बैठक पार पडत असून राज्यात नव्या राजकीय समीकरणांची खलबतं सुरू झाल्याची चर्चा आहे.