महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने घेतला सांगलीतील पुराच्या नुकसानीचा आढावा…

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | जुलै महिन्यात आलेल्या पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज केंद्रीय पथकाने सांगली जिल्ह्यात जाऊन घेतला आहे. वास्तविक जुलैमध्ये पूर आला आणि तब्बल सव्वादोन  महिन्यांनंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथकाकडून जुलैमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या पथकाने आयर्विन पूल, मौजे डिग्रज आणि शिरगाव मधील नागरिकाशी संवाद साधत पुराच्या नुकसानीबाबत माहिती घेतली. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, शिराळा या तालुक्यात महापुराने  एक हजार कोटींवर नुकसान झाले. जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने आतापर्यंत १५० ते २०० कोटींचा निधी दिला आहे; पण या निधीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दमडीही मिळाली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. निदान या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर देखील कृष्णा आणि वारणा नदी काठच्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा आहे. 

वास्तविक जुलै मध्ये पूर आला आणि तब्बल सव्वादोन  महिन्यांनंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जर हाच पाहणी दौरा पूर आल्यानंतरच लगेच जर झाला असता तर महापुराची भीषणता केंद्रीय पथकाला देखील लक्षात आली असती अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. 

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय