महाराष्ट्र

PM Care Fund | ‘केंद्र सरकार स्कॅम ऑपरेट करतेय’; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांची ‘लोकशाही’ला माहिती

Published by : Lokshahi News

पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय ? असा सवाल सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी उपस्थित केला होता. याचं विषयावर आता पीएम केअर फंड चालवून केंद्र सरकार स्कॅम ऑपरेट करत असल्याचा गंभीर आरोप अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केला आहे. 'लोकशाही न्यूज'च्या चर्चासत्रात त्यांनी हा आरोप केला.

'लोकशाही न्यूज'ने 'पीएम केअर' निधीचं नेमकं होतं काय? या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी व इतर राजकिय नेते उपस्थित होते. या चर्चासत्रात पीएम केअर फंडबाबत विश्वास उटगी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात केले.

कोरोना काळात सामान्य नागरीकांना मदत करता यावा यासाठी पीएम केअर फंड चालू करण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाजगी फंड का केला ? खाजगी फंड करताना स्वत:चा फोटो का लावला ? तसेच अशोक स्तंभावर असलेले सिंहाचे तीन प्रतिमा या पीएम केअर फंडच्या पेजवर का वापरण्यात आली, असा सवाल देखील यावेळी अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी उपस्थित केला.

तसेच पीएम केअर फंडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत; ट्रस्टी आहेत. त्यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सितारमण, राजनाथ सिंह आणि अमित शाह देखील आपल्या पदांसह ट्रस्टी आहेत. हे सगळे जण आपल्या पदावर राहून त्याचा पत्ता पंतप्रधान कार्यालय असेल. तर केंद्रसरकार हा मोठा स्कॅम ऑपरेट करत असल्याचा आरोप विश्वास उटगी यांनी केला.

वाद काय ?

पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती नाही. "सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जात आहेत याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही". "जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर गेलात तर तिथे २८ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट आहे. यामध्ये चार दिवसात ३००० कोटी जमा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत आहोत. पण हा पैसा कुठे जात आहे? आपल्याला माहिती नाही" असे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय