महाराष्ट्र

Maratha Reservation । मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी केंद्राने गमावली

Published by : Lokshahi News

राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे गमावल्याची खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या 127 व्या घटना दुरुस्तीबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार योग्यवेळी विचार करेल, असे सांगितले. पण तो विचार करण्याची आणि संसदेत निर्णय घेण्याची हीच सुवर्ण संधी होती. आणखी किती काळ मराठा समाजाने न्यायालयीन लढाई लढायची? मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याचा मार्ग सुकर करणे केंद्राला सहज शक्य होते असे ते म्हणाले.

दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा दिला. पण केंद्र सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही मराठा खासदाराने याबाबत लोकसभेत चकार शब्द काढू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा

Aditya Thackeray यांचा कदम पिता-पुत्रांवर निशाणा ; Ramdas Kadam यांचं जोरदार प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार