महाराष्ट्र

31 जुलैपर्यंत CBSE बारावीचे निकाल जाहीर होणार

Published by : Lokshahi News

सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍िती आज (17 जून) सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. यामध्ये सीबीएसईचे निकाल 31 जुलै रोजी जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अशाचप्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल तसंच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा केला 280 धावांनी पराभव; मालिका 1-0 ने जिंकली