सीबीएसई दहावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. सीबीएसईनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीत घेण्याचा निर्णय घेतला असून याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आजपासून इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा सुरु होत आहेत. तर इयत्ता बारावीच्या पहिल्या टर्मची परीक्षा 1 डिसेंबर पासून सुरु होईल. परीक्षेचं प्रवेशपत्र www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 2021 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल.कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.