मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनांन्स कंपनी/ एडलवाईंज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने सिनेसृष्टी पूर्णपणे हादरली आहे. नितीन देसाईंवर 250 कोटी कर्ज होते. आत्महत्येआधी त्यांनी ऑडिओ क्लीपही त्यांनी रेकॉर्ड केल्या असून एडलवाईज कंपनीमुळे मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख नितीन देसाई यांनी केला होता. यानुसार नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायनान्स कंपनी/ एडलवाईंज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन देसाई यांच्या पत्नीने कर्ज वसुलीसाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. यानुसार आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. या गुन्ह्याचा तपास खालापूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम हे करत आहेत.
दरम्यान, स्थानिक तरुणाच्या दाव्यानुसार, स्टुडिओतल्या 'मराठी पाऊल पडते पुढे'च्या सेटवर एक धनुष्यबाणाची प्रतिकृती काढत नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. तर, बॉलिवूडमधील एका कलाकाराशी झालेल्या वादानंतर बॉलिवूडमध्ये देसाईंच्या एनडी स्टुडिओत शूटिंगवर बहिष्काराला सुरुवात झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. यामुळे नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत गुढ वाढले आहे.