इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधातील खटला रद्द करण्यात आला असून इंदोरीकर महाराजांचा रीव्हिजन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. पुत्रप्राप्तीसंदर्भात इंदोरीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्या विरोधात संगमनेरच्या न्यायालयात खटला भरण्यात आला होता.
मात्र, इंदोरीकर महाराज जाहिरात होईल असे काहीही बोलले नाहीत. ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या गोष्टी त्यांनी सांगितल्याचे अॅडव्होकेट के.डी. धुमाळ यांनी सांगितले आहे.
महाराजांनी केलेलं वक्तव्य गुन्हे स्वरुपात बसत नाही. तसेच महाराजांचा हेतू वेगळा होता, असे स्पष्टीकरण अॅड. के.डी. धुमाळ यांनी दिले आहे. यानंतर इंदोरीकरांच्या समर्थकांनी पेढे देखील वाटले आहेत.