महाराष्ट्र

आंबा घाटात कार ३०० फूट खोल दरीत कोसळली; कार चालकाचा मृत्यू

Published by : Lokshahi News

निसार शेख, रत्नागिरी | कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात कार थेट ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या आंबा घाटात स्विफ्ट गाडी अपघाताचे रेसक्यु ऑपरेशन पूर्ण झाले आहे. या अपघातात संजय गणेश जोशी(६३) यांचा मृत्यू झाला आहे.

स्विफ्ट गाडी कोल्हापूर वरून रत्नागिरीच्या दिशेने निघाली होती. यावेळी आंबा घाटातील वळणावर संरक्षण कठड्या जवळून कार थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती देवरुख पोलीसांसह रेस्क्यू टीमला देण्यात आली होती.

देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव, वाहतूक शाखा सहाय्यक निरीक्षक अमरसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. यावेळी देवरुख मधील राजू काकडे हेल्प अकॅडमी, आंबा मधील वसुंधरा हेल्प अकॅडमी, राजा गायकवाड,पोलीस किशोर जोयशी,अक्षय महाडिक आदींची रेस्क्यू ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली. या घटनेत ३०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. संजय गणेश जोशी(६३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण