महाराष्ट्र

शिवसेनेचं पुढील लक्ष्य दिल्ली? आदित्य ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य…

Published by : Vikrant Shinde

सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (elections 2022) सुरू आहेत शिवसेना त्यापैकी उत्तर प्रदेश (UP Election) आणि गोवा (Goa Election) या दोन राज्यात शिवसेना विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामूळे येणाऱ्या काळात शिवसेना (Shivsena) राष्ट्रीय राजकारणात आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना इतरही राज्यात निवडणूक लढवून दिल्लीत आपलं स्थान बळकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर प्रदेश आणि गोवा ह्या दोन्ही राज्यांत प्रचाराची धुरा शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Cabinet Minister of Tourism and Environment Aaditya Thackeray) ह्यांच्या खांद्यावर आहे.

"मुंबईचे (Mumbai) महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार (Central Goverment) म्हणजे बसणारंच" असे वक्तव्य राज्याचे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचे लक्ष्य आता दिल्ली असल्याचे दिसत आहे. "इतर पक्ष नाटकं करतात आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया (Marathi Bhasha Divas). मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही" असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

"सुभाष देसाईंनी (Subhash Desai) आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर (GR) वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी" अशी प्रांजळ कबूलीही त्यांनी दिली. "मरिन ड्राईव्हला (Marine Drive) आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत. मराठी बदलत आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत." 'गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन' सुरु करत असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

"मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरु असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या (BMC) 1,232 शाळा आहेत. मात्र, कोणतंही बोर्ड असो 10वी पर्यंत मराठी शिकवलीच जाईल", असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबईचे महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं हे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मोठं व सुचक मानले जात आहे.

राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल

महायुतीकडून 286 ठिकाणी 289 उमेदवार रिंगणात

Maharashtra Swarajya Party | स्वराज्य पक्षाचे 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात | Lokshahi News

शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप-मनोज जरांगे पाटील यांची भेट

आमदार श्रीनिवास वनगा मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल