पुणे-सोलापूर महामार्गारील पाटस जवळ तोतया पोलिसांनी एसटी बस थांबवून चार प्रवाशांचे 1 कोटी 12 लाख रुपये आज पहाटे 1 वाजून 15 मिनिटच्या दरम्यान लुटले. निलंगा ते भिवंडी या एसटीतून कुरियर सर्व्हिस करणारे चौघे प्रवास करत होते.
त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख आणि इतर वस्तू होत्या. तोतया पोलिसांनी बस थांबवून एसटीमध्ये प्रवेश केला प्रवाशांना धमकावून कुरिअर सर्व्हिस करणाऱ्या चौघांना खाली उतरवले आणि त्यांच्याकडून पैसे आणि ऐवज घेत दोन दुचाकीवरून पसार झाले.
हा सगळा प्रकार पहाटेच्या वेळी दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी घडला या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपींचे स्केच जारी केला आहे.