कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिक आणि व्याघी असलेल्यांना १० जानेवारीपासून तिसरा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मराठवाड्यात ८७ हजार लसवंतांना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० जानेवारीपासून ही लस देण्यास सुरुवात होणार आहे.
सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करसह इतर पात्र नागरिकांना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार ४९४ आरोग्य कर्मचारी, १३ हजार ८०८ फ्रंटलाइन वर्करला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.