पुणे रेल्वे स्थानकावर (pune junction) दोन बाँब सापडले आहे. यामुळे संपुर्ण परिसर सील करण्यात आला असून बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अज्ञात व्यक्तीने ही स्फोटके ठेवली आहे. (bomb squad police) दरम्यान पोलिसांनी एक बाँब निकामी केला असून दुसरा निकामी करण्यात यश आले.
राज्यात हादरवणारी बातमी पुण्यातून आली आहे. गेल्या आठवड्यात वाघोलीतून पुणे स्टेशनवर बॉंब ठेऊन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर १३ मे रोजी पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारवर एक बाँब ठेवला. दुसरा बाँब रेल्वे स्थानकावर सापडला.
पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सापडल्यानंतर लागलीच बाँबशोधक पथक घटनास्थळी पोहचला आहे. पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वेही थांबण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यात बॉंब सापडल्यामुळे गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
बॉम्ब शोधक पथकाने बाँब निकामी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अजून कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली नाही.
घटनेची वरिष्ठ पोलिसांनी घेतली माहिती
घटनेची रेल्वेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनी माहिती घेतली असून सुरक्षेच्या द्दष्टिने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून चौकशी सुरु
बाँब निकामी केल्यानंतर आता पोलिसांनी चौकशी वेगाने सुरु केली आहे. पोलिसांनी हा बाँब कोणी ठेवला त्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे बाँब निकामी केल्यानंतर पोलिसांनी परिसर प्रवाश्यांसाठी मोकळा केला आहे. आता प्रवाशींची ये-जा सुरु केली आहे.