महाराष्ट्र

आधी रक्तदान करा नंतर लस घ्या

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून इतर राज्यांचा तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती अधिक गंभीर आहे. यातच १ मेपासून राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. परंतु लस घेतल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येत नाही. यामुळे राज्यात आत रक्त तुटवड्याचे नवे संकट निर्माण झाले आहे आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

आता रुग्णालयांमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर ६० दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या, असे वडेट्टीवार म्हणाले.

२८ एप्रिल नंतर cowin.gov.in. या अधिकृत संकेतस्थाळावर ऑनलाइन नोंदणी करा. कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रक्ताचा तुटवडा पाहून सामाजिक भान ठेवून रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर