नाशिक : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत आहे. अशातच, सकल मराठा समाजाने काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी नाशिकमधील मराठा समाज आक्रमक झाले आहेत. सकल मराठा समाज काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज काळी दिवाळी साजरी करणार असल्याचे सकल मराठा समाजच्या वतीने सांगण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास दिवाळी साजरी करणार नाही. एकाही मराठा बांधवाच्या दारात दिवा, पणती पेटणार नाही, असेही मराठा समाजाने सांगितले आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र, सर्वपक्षीय नेते आतून एकच, मराठ्यांना वेड्यात काढतात. सर्वच पक्षांनी फसवणूक केल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे.