अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेवक संदीप आवारी यांची निर्विरोध निवड झाली आहे. आवारी यांच्या निवडीनंतर भाजप नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर एकच जल्लोष केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकित दिलेल्या मुदतीत भाजप नगरसेवक संदीप आवारी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संदीप आवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवारी यांच्या निवडीनंतर भाजप नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर एकच जल्लोष केला.