महाराष्ट्र

भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात; केंद्रातले 39 मंत्री 212 लोकसभेपर्यंत पोहोचणार

Published by : Lokshahi News

केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील पाच लोकसभा मतदारसंघांत प्रवास असेल.

या जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकारचे 39 मंत्री हे देशभरातील 212 लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या 'जन आशीर्वाद' यात्रेची सुरुवात केली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघरमधून जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. केंद्र सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि राज्यातील महाविकास आघाडीचे अपयश लोकांना सांगणे हा उद्देश या यात्रेमागे असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका असल्याने या जन आशीर्वाद यात्रेमध्ये त्या राज्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं समजत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती