महाराष्ट्र

भाजप कार्यकर्ते धावले सेनेचं कार्यालय फोडायला…

Published by : Lokshahi News

किरण नाईक | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त विधानानंतर आज सकाळपासूनच शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर शिवसेनेकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या प्रतिउत्तरात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमून शिवसेना कार्यालयावर दगड काठी घेऊन हल्ला करण्यासाठी निघाले आहेत.

भाजप कार्यालयावरती झालेल्या हल्ल्यानंतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमून शिवसेना कार्यालयावर हल्लाबोल करण्यासाठी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयावर निघाले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दगड काठी हातात घेऊन निघाले. यावेळी एका बाजूला बीजेपी पक्षाचे कार्यकर्ते आणि दुसर्या बाजूला शिवसैनिक उभे ठाकले होते. दरम्यान महाकवी कालिदास येथे भाजप आणि शिवसेना कार्य़कर्ते समोरासमोर ठाकल्यानंतर एकमेकांवर दगड फेक करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक सुरू असताना पोलिसांवर देखील दगडफेक झाली. यावेळी भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे दगडफेकीच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. भद्रकाली पोलीसांनी परीस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्याण सेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या धुमश्‍चक्री प्रकरणी पोलीस आक्रमक झाले आहेत. भद्रकाली पोलिस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच दगडफेकीचे व्हिडीओ तपासून नावे निष्पन्न करणार आहे. भद्रकाली पोलिसांच्या दोन टीम दगडफेक करणाऱ्यांच्या शोधार्थ रवाना झाली असून दहा जणांना अटक बारा जणांचा शोध सुरू आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी