महाराष्ट्र

NCP vs BJP वाद चिघळणार; राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जबर दुखापत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राष्ट्रवादीच्या (NCP) पक्ष कार्यालयावर भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जबर दुखापत झाली असल्याचे समजते आहे. आप्पा जाधव (Appa Jadhav) असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमधील (NCP vs BJP) तणाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

आप्पा जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पुण्यातील नारायण पेठेत हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. याठिकाणी भाजपच्या माथाडी सेलचा माजी अध्यक्ष संतोष कांबळे (Santosh Kambale) हा त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात आला.

कांबळे व त्याच्या साथीदारांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. यावेळी जाधव यांना जबर दुखापत झाली. यानंतर कांबळे व त्यांच्या साथीदारांनी दुचाकीवरुन पळ काढला. कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, मध्यंतरी भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या आप्पा जाधव यांनी कानशिलात लगावली होती. याचाच राग मनात धरुन भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा संशय राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...