२०२२ साली उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्याच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी भाजपा सरकारने हा निर्णय घेतलाय.
यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारने घेतला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने घेतलाय. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्यांच वृत्त टाइम्स नाऊ वृत्त वाहिनेने दिलंय.
जुलै महिन्यापर्यंत हे सर्व खटले मागे घेण्यासाठीच्या हलचाली सुरू झाल्यात. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष राधा मोहन सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.