सांगली : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदी विजयी झाल्या आहेत.
आटपाडी येथील पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्याय या निवडणुकीत हिराबाई कुंडलिक पडळकर या विजयी झाल्या आहेत. सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत. आणि पडळकरवाडी ग्रामपंचायतवरही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. निवडणुकीत 7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत.
गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान झाल्या आहेत.