महाराष्ट्र

जळगावात गिरीश महाजनांना धक्का : भाजपाला खिंडार पाडत शिवसेनेने महापालिकेवर फडकावला भगवा

Published by : Lokshahi News

एकीकडे सचिन वाझे प्रकरणात भाजपा शिवसेनेची कोंडी करत असतानाच शिवसेनेने जळगावात भाजपाला खिंडार पाडत महापालिकेवर भगवा फडकवला आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज (17 मार्च) निवडणूक झाली. एमआयएमच्या तीन नगरसेवकांसह भाजपाच्या 27 नगरसेवकांना गळाला लावल्याने महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजनांच्या वर्चस्वालाच धक्का बसला आहे.
जळगावचे महापौरपद आपल्याकडे राखत गिरीश महाजन यांनी आपल्याकडे महापालिकेची सूत्रे ठेवली होती. जळगाव महापालिकेमध्ये एकूण 75 नगरसेवक आहेत. भाजपचे 57, शिवसेनेचे 15, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते. महपौरपदासाठी एकूण 38 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपा नगरसेवकांच्या एका गटाने बंडखोरी केली. भाजपाच्या 57 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक हे शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला 45 मते मिळाली. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव करून महापौरपद मिळवले. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.
शिवसेनेमध्ये सामील झालेले 27 नगरसेवक सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. या नगरसेवकांबरोबरच एमआयएमचे तीन नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. यानिमित्ताने जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी