महाराष्ट्र

BJP letter to governor : भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे भाजपने काय केली मागणी? वाचा सविस्तर

एकनाथ शिंदे (Eknah Shinde News) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेले काही दिवस भाजप सावध पवित्रा घेताना दिसत होती. वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर आता राजकीय पावलं उचलायलाही सुरुवात केलीय.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. याचपार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) राज्यपालंना पत्र लिहिलंय. एकनाथ शिंदे (Eknah Shinde News) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेले काही दिवस भाजप सावध पवित्रा घेताना दिसत होती. वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर आता राजकीय पावलं उचलायलाही सुरुवात केलीय. पहिल्यांदाच राजकीय भूकंपानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना महाविकास आघाडीच्या गेल्या 48 तासांच्या कामगिरीवरुन शंका उपस्थित केली आहे.

प्रवीण दरेकरांचं पत्र जसंच्या तसं

दिनांक : 24, जून 2022

प्रति,

मुंबई, दि. 24 जून 2022

मा. भगतसिंग कोश्यारीजी

महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र

विषय: राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत

महोदय,

कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो

एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे

अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलात झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.

महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हवकाच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे.

प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यपालाना हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपने पाठवलेल्या पत्रावर राज्यपाल नेमकी काय ाकरावई करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी