महाराष्ट्र

अमरावतीत भाजपचे गांधी पुतळ्यासमोर निषेध आंदोलन

Published by : Lokshahi News

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमसभेत घुसून हल्लाबोल आंदोलन केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने युवा स्वाभिमान पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. अमरावती शहरातील जयस्तंभ चौक येथील गांधी पुतळ्या समोर हे आंदोलन पार पडले.

मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार ईटकॉन्स सोल्युशन्सच्या मनमानी विरोधात आक्रमक युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी काल आमसभेच्या प्रतिष्ठेला तडा देत सुरक्षा रक्षकाला न जुमानता धक्काबुक्की करत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बळजबरी प्रवेश केला.

यावेळी त्यांनी कंत्राटदाराचा निषेध व घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. त्याच्या या नियमबाह्य गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प पडले. त्यानंतर महापौरांनी काही वेळासाठी सभा स्थगित केली.

मनपाच्या इतिहासात प्रथमच असे घडले. निषेध ठराव घेण्यासाठी पुन्हा आमसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर संतप्त सदस्यांनी युवा स्वाभिमानच्या या कृत्याची निंदा केली. त्यानंतर सभापतींनी सभा पूर्णत: स्थगित केली. नंतर अमरावती महापौरांच्या नेतृत्वात सीपींची भेट घेऊन मनपा पदाधिकारी, सदस्यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...