संजय राठोड | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.या अटकेनंतर रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर झाला. या सर्व घडामोडीनंतर आता भाजप आक्रमक झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य 25 ऑक्टोबर 2020च्या दसरा मेळाव्यात केले होते. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजू पडगीलवार यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ, उमरखेड नंतर इतरही तालुक्यातील पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाणार आहे.