महाराष्ट्र

Pratik Kale Suicide Case ; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या चौकशीची भाजपची मागणी

Published by : Lokshahi News

संतोष आवारे, अहमदनगर | प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हॉट्सऍप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी सुनीता तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.

मुळा एज्युकेशन मध्ये क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे याने 29 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांवर गुन्हा दाखल असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हाट्सएप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिप मध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.

आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर ठिया आंदोलन केले त्यावेळी बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले. मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले यावर पोलीस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी अशी मागणीही मुरकुटे यांनी केली.

वंचितच्या आंदोलनादरम्यान एसपी कार्यालयाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त होता. रास्ता रोको केल्यामुळे औरंगाबाद, मनमाड, पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात संगमनेर, औरंगाबाद, नेवासे व अहमदनगर शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंत्री गडाख यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन