ओबीसीच राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर हा मुद्दा भाजपने चांगलाच लावून धरला आहे. भारतीय जनता पक्षा तर्फे महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात यापूर्वीही आंदोलन करण्यात आलं. आज परत भाजप ओबीसी आघाडी तर्फे जन आक्रोश आंदोलन नागपूरच्या संविधान चौकामध्ये करण्यात आला यावेळी ओबीसींना आरक्षण मिळालाच पाहिजे असे नारे लावण्यात आले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून आरक्षण लागू केलं होतं पण महाविकास आघाडी सरकार आरक्षण टिकवू शकले नाही त्यांना तीन महिन्यात समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले होते तरीही त्यांनी समिती गठित केले नाही आणि त्यामुळेच आरक्षण हे रद्द झाला आहे असाही आरोप महाविकासआघाडी वरती यावेळी ओबीसी भाजप ओबीसी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
नुकत्याच रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदर संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या आदेशानुसार तीव्र बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सचिन केदारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.