महाराष्ट्र

राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Published by : Vikrant Shinde

राज्यातील उस ऊत्पादक शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) यंदा भेडसावणारी चिंता होती ती उस तसाच शिल्लक राहण्याची. त्याचं कारण म्हणजे, यंदा राज्यात उसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर झालं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
"राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडील सगळा ऊस ऊस संपेपर्यंत कुठलाही कारखाना बंद होवू देणार नाही. जर मे महिन्यानंतर ऊस शिल्लक राहिल्यास रिकव्हरी लॉस (Recovery Loss) होईल. त्यासाठी राज्य सरकार मदतीचा विचार करेल." असं आश्वासक वक्तव्य अजित पावारांनी केलं आहे.

जरंडेश्वर कारखान्यासंदर्भातील आरोपांवर काय म्हणाले अजित पवार?
"जरंडेश्वर साखर कारखाना नियमानुसार ६५ कोटींना विकला गेलाय. परंतु हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) सहकारमंत्री असताना संजय कारखाना केवळ ३ कोटींना विकला, तर बाराशिव कारखाना २८ कोटींना विकला गेला त्यावर कधी चर्चा का झाली नाही" असा सवाल अजित पवारांनी टीकाकऱ्यांना विचारलाय.

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया