राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एसीबीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं.मलिक यांनी ट्वीट करत याची माहिती दिली होती. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे.
एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत ऐकवली. यासोबतच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिक म्हणाले की, "समीर वानखेडे बातम्या प्लांट करतायत की मला एक्सटेन्शन नकोय. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरू आहे.
३१ तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिलं जावं. अजून निर्णय झालेला नाही", नवाब मलिक तुम्हाला घाबरणारा नाही. तुमच्या फर्जीवाड्याला उघड करण्याचं काम केलं जाईल" असे नवाब मलिक म्हणाले