महाराष्ट्र

”भावली धरणाचे पाणी शहापुरला जाऊच देणार नाही”; जलपूजन प्रसंगी नरहरी झिरवाळ यांचा इशारा

Published by : Lokshahi News

विकास काजळे । इंगतपुरी तालुक्याची जलवाहिनी असणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील भुसंपादना करीता अनेक शेेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे यामागे तालुक्याच्या शेतकऱ्याचां मोठा त्याग आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयानाचा मिळेल, त्यामुळे भावली धरणाचे पाणी शहापुरला जाऊच देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला. भावली धरण जलपूजन प्रसंगी ते बोलत होत.

भावली धरण चार दिवसांपूर्वी ओहरफ्लो झाले असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. गतवर्षी भावली येथील पर्यटसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून कोरोना महामारीत राज्यसरकारला अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तो निधी आगामी काळात माझ्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्यातुन पर्यटनमंत्री यांची भेट घेऊन भावली धरणासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे आमदार खोसकर म्हणाले. भावली पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच तालुक्यातील धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी यावेळी दिली.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू