लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील शर्जील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हिंदूंवर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून सर्वत्र विरोध करण्यात येत आहे. यावरून भाजपने शर्जीलला तत्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे. मात्र आता बी.जी कोळसे पाटील यांनी 'लोकशाही न्यूज' शी बोलताना संबंधित प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे.
आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांनी शर्जील उस्मानीची बोलताना चूक झाल्याचं म्हटलंय. आम्ही त्याच वेळी हे मान्य केल्याचं पाटील यांनी सांगितलं. मनुवाद ऐवजी हिंदू शद्ब वापरला, त्याचवेळी उस्मानी याला सांगितले होते. मात्र आता हिंदू शब्दाचा ज्यांना कळवळा आहे, त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करायला तयार आहे, असे वक्तव्य बी.जी कोळसे पाटील यांनी केले आहे.
पुण्यात ३० जानेवारीला झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी अखेर उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र कितीही झालं तरी मनुवादाविरोधात लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
काहीही झालं तरी पुढे ही एल्गार परिषद होणारच, यावर बी.जी.कोळसे पाटील ठाम आहेत.