विकास माने, बीड | राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर बीडच्या आठ वर्षीय मुलीने सर केले आहे. तब्बल पाच हजार चारशे फूट एवढे अंतर असलेले हे शिखर अवघ्या तीन तासात तिने कापले आहे. सिद्धी सानप असे या चिमुकलीचे नाव असून तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बीड शहरातील सारडा नगरीत सिद्धी सानप ही आठ वर्षाची चिमुरडी वास्तव्यास आहे. अजिंक्य ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी आणि टीमने कळसूबाईची मोहीम यशस्वीपणे सर केलीय. या टीममध्ये 8 ते 54 वर्षे वयोगटातील मुले-मुली महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे ससाणे यांच्या टीमने मोहिमेला सकाळी दहा वाजता सुरुवात केली. यामध्ये सिद्धी सानप सर्वांची आकर्षण ठरली. एवढ्या कमी वयात तिने तीन तासात पाच हजार 400 मीटर चढाई केली आहे. त्यामुळे तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.