रोज सकाळी लवकर उठून आपण दूध घेण्यासाठी बाहेर पडतो आणि दूधकेंद्राच्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहून सर्व सामान्य माणूस दूध घेत असतो. पण तूम्ही तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवून दूध नाही तर पिशवी बंद विष विष विकत घेत आहात. कारण मुंबईत भेसळ दूध बनवून ते नामांकीत दूधाच्या पिशवीत बंद करुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
मुंबईतल्या सांताक्रूझ विभागातून दूधात भेसळ करून ते दूध नामांकित कंपन्यांच्या नावाने पॅकबंद करण्याचा व्हिडीओ सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता.प्रशासना जाग येताच त्या ठिकाणी छापा टाकून तब्बल १८० लिटर भेसळ दूध जप्त केले. याआधीही मालाड-गोरेगाव परिसरात याप्रकरणी ३ जनांना अटक केली होती. सातत्याने दूध भेसळीच्या घटना घडत असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे.
ब्रँडवर विश्वास ठेवून आपण आपल्या मुलांना दूध देतो.मात्र ब्रँडेड दुधाच्या पिशव्यांमध्ये घाणेरडं पाणी वापरून भेसळयुक्त दूध बाजारात येत. अन्न आणि औषध प्रशासन छापे टाकून असे प्रकार रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतंय. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भेसळमाफियांना कडक शासन करण्याची गरज आहे.
२५ मे रोजी अंधेरीमध्येही अशाच पद्धतीनं दूधभेसळ करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्यांच्याकडून तब्बल 300 लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. शिवाय भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्यही मोठ्या प्रमाणात हाती लागलं होतं.