'मे' महिन्यात मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 9 दिवस बंद राहणार आहेत.बँकांच्या विविध सुट्यांमुळे 5 दिवस बँका बंद राहतील. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे 2021 मध्ये बँका एकूण 9 दिवस बंद राहतील.
कोणत्या दिवशी बँक बंद राहणार?
● 1 मे – 1 मे हा महाराष्ट्र दिनानिमित्त (कामगार दिन) बँका बंद राहतील..
● 7 मे – उमत-उल-विदा च्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद राहतील.
● 13 मे – या दिवशी ईद (ईद-उल-फितर) आहे.
● 14 मे – भगवान श्री परशुराम जयंती, रमजान-ईद, बसवा जयंती आणि अक्षय तृतीया यामुळे अनेक ठिकाणच्या बँका बंद राहतील.
● 26 मे – बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी देखील अनेक ठिकाणच्या बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
● रविवारी व्यतिरिक्त दुसर्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.
● 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार आहे, तर 8 आणि 22 मे रोजी दुसरा आणि चौथा शनिवारमुळे बँका बंद असतील.