पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील काही नेतेमंडळी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन हॅक केले गेल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला असून त्यामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या तपासावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
बाळासाहेब थोरात आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून पत्रकार व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवण्याचा आरोप केला आहे. तसेच दैनिक भास्कर आणि भारत समाचार वरील आयकर विभागाच्या धाडी हा स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आणि देशाच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याची गंभीर टीका बाळासाहेब थोरात यांनी केला. मोदी सरकार यंत्रणांचा गैरवापर करून देशात हुकुमशाही आणू पाहत असल्याची जळजळीत टीका केली आहे.