महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटर खातं लॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे थोरात यांच्या टि्वटर खात्यावर कारवाई केल्याचा सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांसोबतचा फोटो टि्वट केला होता. यानंतर टि्वटरनं काही काळासाठी राहुल यांचं टि्वटर लॉक केलं होतं. त्यानंतर ते पुन्हा पुर्नस्थापित करण्यात आलं.
दरम्यान, या प्रकारानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल यांच्या समर्थनार्थ मैं_भी_Rahul असा हॅशटॅग वापरत टि्वट केले. त्यानंतर टि्वटरनं पुन्हा एकदा काही काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहेत. यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या टि्वटर खात्याचा समावेश आहे.