लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडिया स्वायत्त असली पाहिजे आणि मीडियाला स्वतंत्र विचार मांडता आले पाहिजेत. मात्र दुर्दैवाने 2014 नंतर मीडियावर बंधन टाकण्यात आली जो स्वतंत्र विचार मांडेल त्याच्यावर काही ना काही कारवाई करायची मात्र जनता हे सर्व पाहत आहे. असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकशाही मराठीवर केलेल्या कारवाईवर व्यक्त केला आहे.