महाराष्ट्र

बच्चू कडू विलगीकरणात; यापूर्वी दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागात लॉकडाउन करण्यात आला आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनादेखील दोनवेळा कोरोना होऊन गेला आहे. पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी कॅबिनेटमंत्री धनंजय मुडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचं समोर आलं होतं.

बच्चू कडू यांनी टि्वटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. 'पुढील ३ दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्यानं रॅपिड अँटीजन टेस्ट केली ती निगेटीव्ह आली आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे' असं टि्वट बच्चू कडू यांनी केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी बच्चू कडू यांनी टि्वट करून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचं सांगितलं होतं.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती